जरा विसावू या वळणावर.....

       जरा विसावू या वळणावर.....


नवीन वर्षाची सुरुवात, नवीन संकल्प








पुढे जात असताना , पुढील आयुष्यात वाटचाल करत असता मागील अनुभवांची शिदोरी खूप महत्त्वाची असते.ही शिदोरी बरोबर घेऊन जाण्यासाठी थोडं थांबा, मागे वळून पहा आणि सर्व बरं वाईट जे काही घडलं त्याचा लेखाजोखा बरोबर घेऊन चला.

भले बुरे जे घडून गेले
    विसरून जाऊ सारे क्षणभर
       जरा विसावू या वळणावर
या वळणावर...


बघता बघता वर्ष संपले.नविन वर्ष सुरू झाले.पुन्हा नवीन संकल्प.

पण जरा क्षणभर थांबुया,थोडं मागे वळून बघूया आणि आपल्या आयुष्यात जे काही बरं - वाईट घडून गेलं ते आठवूया. जे काही चांगलं घडलं आहे त्याच्याही पेक्षा अजून चांगलं मिळवण्याचा ध्यास धरूया व त्याला प्रामाणिक प्रयत्नाची जोड देऊया.

जे वाईट किंवा आपल्या मनाप्रमाणे घडलं नाही , ज्याच्यामुळे आपल्याला फार त्रास झाला अशा सर्व गोष्टी ह्या अनुभव म्हणून आपल्या बरोबर घेऊन त्याच्यातून आपल्याला कसं चांगलं घेता येईल आणि चांगलं करता येईल असा दृष्टिकोन समोर ठेऊन पुन्हा नव्याने , नव्या जोमाने , उत्साहाने,जिद्दीने आयुष्याला सुरुवात करूया.

निघून गेलेली वेळ आपण आपल्या आयुष्यात कधीच परत आणू शकत नाही.  उदाहरण द्यायचं झालं तर,

जसं प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या भूतकाळाचे रूपांतर आपण वर्तमानात आणि भविष्य काळात करू शकतो तसं आपल्या आयुष्यातील भूतकाळ आपण कधीच बदलू शकत नाही.मात्र आपण आपला वर्तमान अशा पद्धतीने जगू की येणारा भविष्यकाळ हा सुखकर,समाधानकारक, आनंदिमय आणि नव चैतन्य निर्माण करणारा असेल.

असणाऱ्या प्रत्येक क्षणामध्ये आनंद शोधला पाहिजे.प्रत्येक काम आनंदाने आणि उत्साहाने केलं पाहिजे आणि आपण वर्तमानातच जास्त जगलो पाहिजे.आपण वर्तमानात न जगता भूतकाळ  आणि भविष्य काळाचा जास्त विचार करतो.

म्हणजेच , मी असं केलं असत तर,तसं केलं असतं तर आणि बरंच काही.

जर आणि तर याचा फार विचार करतो. दुसरं म्हणजे भविष्याच्या ध्यासाने वर्तमानातील आनंदाचे क्षण विसरून जातो,जगायचे राहूनच जातो.

आपण जगतो ते आपल्या स्वप्नांसाठी.स्वप्नपूर्ती साठी. आणि आपल्या आयुष्यात जे महत्वाचे क्षण,महत्वाचे दिवस आहेत ते जगायचे विसरूनच जातो. आपण स्वतःला वेळ कधी देतच नाही.

तर आजपासून संकल्प करूया की, मी प्रत्येक क्षण आनंदाने जगेन,उत्साहाने जगेन, स्वतःसाठी, स्वताच्या आरोग्यासाठी ,स्वताच्या इच्छांसाठी  वेळ देईन.प्रत्येक नवीन दिवस नव्याने सुरुवात करेन.नव्याने जगेन.

हे करत असताना मला देवाचे आभार मानायचे आहेत की कालचा माझा दिवस माझ्या आयुष्यातून निघून गेला पण आज पुन्हा मला नवीन दिवस दाखवला आहे.

आज मी ठणठणीत आहे,बरी आहे,नवीन दिवस पाहतेय.

आपल्याकडे आजचा दिवस आहे.जे काही करायचं ते आजच करायचं आहे कारण आपल्याला माहीत नाही की उद्या आपल्या आयुष्यात आहे की नाही.


               आजचा विचार  जास्त करूया

           जे मिळवायचं आहे त्याचा ध्यास धरूया

               प्रामाणिक प्रयत्न करूया

                स्वतासाठी थोडा वेळ देऊया

                प्रत्येक क्षण आनंदाने जगुया

                आरोग्य नीट सांभाळूया 

                अनुभवांची शिदोरी बरोबर घेऊया

                आणि नवीन वर्ष नवीन जोमाने सुरू करूया


 नविन वर्षाच्या सर्वाना आनंदिमय,उत्साहवर्दक आणि आरोग्यमयी शुभेच्छा


लेखन,
डॉ. मनिषा मोरे
व्हाट्सएप- 9511775185



Post a Comment

1 Comments

  1. लेख आवडला तर प्रतिक्रिया जरूर नोंदवा. धन्यवाद

    ReplyDelete

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏