ब्लॉग सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात

 ब्लॉग सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ??


Create blog,blogger icon, blogging , make your blog
ब्लॉग सुरू करण्यापूर्वी


ब्लॉग काय आहे? ब्लॉग कसा सुरू करावा? ब्लॉग चे विषय कसे निवडावे?

आपण जेंव्हा विचार करतो नवीन ब्लॉग सुरू करण्याचा तेंव्हा वर दिल्याप्रमाणे असे बरेच प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात आणि या सर्व प्रश्नांचा गोधळ सुरू होतो.आपल्याला आपल्या प्रश्नांची नेमकी उत्तरे मिळत नाहीत आणि मग आपण आपलं काम आर्ध्यातच सोडून देतो.

तुम्ही मात्र काळजी करू नका.या पोस्ट मधून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.सर्वात प्रथम ब्लॉग म्हणजे काय हे जाणून घ्या.या अगोदरच्या पोस्ट मध्ये मी अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीने ब्लॉग म्हणजे काय ?? What is a blog??  हे  सांगितले आहे.


ब्लॉग बनवण्यापूर्वी काही गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवल्या पाहिजेत.

  • ब्लॉग बनविण्याचा उद्देश / Goal to make a blog :

ब्लॉग कशासाठी बनवायचा आहे.तुमचा उद्देश काय आहे.तुम्हाला आवड आहे म्हणून करताय की ब्लॉग च्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी आहे म्हणून ब्लॉग सुरू करणार आहात हे सर्वात प्रथम निश्चित असलं पाहिजे.

  • भाषा / Language of Blog: 

सर्वात महत्वाचे म्हणजे ब्लॉग कोणत्या भाषेमध्ये सुरू करणार आहात.तुमचे कंटेंट्स कोणत्या भाषेमध्ये लिहिणार आहात. जगामध्ये बोलल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त भाषेमध्ये तुम्ही ब्लॉग लिहू शकता.जी भाषा सोपी आणि सोयीस्कर वाटते ती भाषा तुम्ही ब्लॉग सुरू करण्यासाठी निवडू शकता.

  • माध्यम / Blogging Medium :

कोणत्या माध्यमातून तुम्ही ब्लॉग सुरू करणार आहात.गुगलचं मध्यम आहे ब्लॉगर या नावाने.सर्वात प्रचलित जास्तीत जास्त वापरले जाणारे ब्लॉगर ( blogger.com)    हे माध्यम सोईस्कर.हे माध्यम विनाशुल्क आहे.फ्री आहे.कोणत्याही प्रकारचं कोडिंग करण्याची गरज नाही.वापरण्यासाठी खूप साधं आणि सोपं असं हे माध्यम जास्तीत जास्त याचा वापर केला जातो.
असे बरेच फ्री आणि आटोमॅटिक माध्यमं आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा फ्री मध्ये ब्लॉग सुरू करू शकता.यामध्ये अजून एक खूप प्रचलित आणि जास्तीत जास्त वापरलं जाणारं माध्यम म्हणजे वर्डप्रेस. हे देखील फ्री आणि बिना कोडिंग चं आपण वापर करू शकतो. अतिशय सोपं वर्डप्रेस ( HTTPS://WordPress.com )

  • होस्टिंग / Blog Hosting :

तुमच्या ब्लॉग साठी इंटरनेट वर जे ठिकाण निवडणार आहात ते म्हणजे डोमेन नेम फ्री मध्ये करणार आहात की पेड म्हणजे पैसे देऊन कस्टम डोमेन निवडणार आहात हे ठरवून घ्या.अर्थात तुम्ही ब्लॉग कशासाठी सुरू करणार आहात याच्यावर अवलंबून आहे फ्री किंवा पेड डोमेन वर काम करणं.

  • कंटेंट्स आणि तुमचे युजर्स / Contents and Users :

ब्लॉग च्या माध्यमातून तुम्ही कोणत्या युजर्स ना तुमचे कंटेंट्स पाठवणार आहात.म्हणजेच तुमच्या ब्लॉगचे युजर्स कोण असणार आहेत. लहान मुलं, शाळेची मुलं, तरुण वर्ग, कॉलेज वर्ग,नोकरदार, व्यावसायिक, महिला वर्ग,पुरुष वर्ग यांपैकी तुमचा ब्लॉग कोणासाठी असेल हे निश्चित करा.
यानंतर ब्लॉगच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची माहिती लोकांच्या पर्यंत पोहचवणार आहात ते निश्चित करा.म्हणजेच तुमचा ब्लॉग प्रेरणादायी असणार,शैक्षणिक असणार,ऑडिओ, व्हिडीओ इन्फॉर्मेशन असणारा असणार, न्युज आणि टेकमीडिया यावरती आधारित असणार या गोष्टी निश्चित झाल्या पाहिजेत.
ब्लॉग च्या माध्यमातून तुम्ही कथा, कविता, चारोळ्या,बोधकथा, सर्व प्रकारचे लेख, करियर मार्गदर्शन, शैक्षणिक माहिती, स्पर्धा परीक्षा माहिती,सरकारी व खाजगी नोकरीच्या संधी याविषयी माहिती,सरकारच्या वेगवेगळ्या सुविधा याविषयी माहिती,बातम्या, चालू घडामोडी, फिल्म इंडस्ट्री विषयी माहिती, टीव्ही मालिका आणि सिनेमा याविषयी माहिती, देश आणि इतिहास याविषयी माहिती,पारंपरिक सण व उत्सव आणि आपल्या स्थानिक परंपरा, जगभरातील वेगवेगळ्या वास्तू याविषयी माहिती, हिंदी मराठी सुप्रसिद्ध गाणी यांचे ऑडिओ व्हिडीओ असे एक ना अनेक विषय आहेत यापैकी तुम्हाला ज्यामध्ये आवड आहे ते विषय निवडून तुम्ही तुमच्याकडील माहिती लोकांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकता.

  • ब्लॉग पोस्ट फ्रिकव्हेंसी / Blog Post Frequency:

ब्लॉग सुरू झाल्यानंतर ब्लॉग पोस्ट कशा पोस्ट कराल.किती दिवसातून, किंवा तासातून एक ब्लॉग पोस्ट पब्लिश कराल का रोजच्या रोज ब्लॉग पोस्ट पब्लिश कराल आणि तुमच्या वाचकांपर्यंत तुम्ही लिहिलेली माहिती घेऊन जाणार हे ठरवा.

  • कंटेंट क्वालिटी Content Quality :

ब्लॉग पोस्ट लिहिताना तुमची माहिती ही तुम्ही स्वतः लिहिलेली असली पाहिजे.ती दुसऱ्या कुणाची तरी कॉपी पेस्ट केलेली नसावी.कुणाची तरी चोरलेली नसावी.दुसऱ्या कुणीतरी लिहिलेली आणि पब्लिश केलेली माहिती आपण आपल्या नावावर पब्लिश करत असू तर याला सायबर क्राईम म्हणतात.कायद्याने हा गुन्हा आहे.इंग्लिश मध्ये याला प्लाजियरिझम ( Plagiarism ) असं म्हंटलं जातं.आपले कंटेंट्स प्लाजियरिझम आहे की नाही हे चेक करण्यासाठी इंटरनेटवर वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत.याचा वापर करून लगेच समजतं आपले कंटेंट्स ओरिजिनल आहेत की कॉपी पेस्ट केलेले आहेत.त्यामुळे ब्लॉगिंग क्षेत्रात चांगलं नाव होण्यासाठी सर्व ब्लॉगर्स नी आपल्या ब्लॉग ची क्वालिटी चांगली ठेवावी.सर्व ब्लॉग पोस्ट ओरिजिनल असाव्यात. कोणतंही कॉपी पेस्ट केलेलं मटेरियल , माहिती ही वाचकांना देऊ नये.यामुळे तुमच्या ब्लॉग चे वाचकही वाढतील आणि सर्च इंजिन वर तुमचा ब्लॉग रँक ही होईल.

  • प्रमोशन  Blog Promotion:

एकदा का सर्व गोष्टी निश्चित झाल्या की सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे तुमचा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांना माहीत कसा होईल याची काळजी घ्यावी लागेल.तुमच्या ब्लॉग च्या माध्यमातून तुम्ही जी माहिती किंवा जे लिखाण करत आहात ते जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहचेल यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.

यासाठी तुम्ही सोशल मीडियाची मदत घेऊ शकता.यामध्येप्रामुख्याने फेसबुक,ट्विटर ,लिंकडईन ,व्हाट्सअँप कोरा , पिंटरेस्ट      असे बरेेच प्लेटफॉर्म आहेत.

ब्लॉग प्रमोशन साठी अश्या बऱ्याच सोशल प्लॅटफॉर्म चा वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉग विषयी वाचकांना माहीती देऊ शकता.


ब्लॉग एक असं माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या कला तुमच्या लिखानामधून लोकांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकता.





लेखन,
प्रा.डॉ. मनिषा पाटील-मोरे
वशी-कासारशीरंबे
व्हाट्सएप--9511775185
डॉ. मनिषा मोरे, Dr.Manisha More





Post a Comment

0 Comments