What is blog ?
ब्लॉग म्हणजे काय ?
What is blog ? What is blogging ?
How to start our own blog ? How to earn money from blogging?
ब्लॉग म्हणजे काय आणि ब्लॉग कसा सुरू करावा? ब्लॉग च्या माध्यमातून पैसे कसे कमावले जातात?
|
ब्लॉग |
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात खूप आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे त्यामुळे संपूर्ण जग खूपच फास्ट झाले आहे.आपल्या दैनंदिन जीवनातही आयटी ने खूप मोठा प्रभाव सोडला आहे.आपण आपली बरीचशी दैनंदिन कामं पूर्ण करण्यासाठी देखील जास्तीत जास्त या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागलो आहोत.त्यामुळे आपला बराचसा वेळ देखील वाचत आहे.
काही वर्षांपूर्वी एखाद्या लेखकाला त्याचं लेखन पूर्ण झाल्यावर ते चार लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्यासाठी एक उत्तम प्रकाशन शोधावं लागायचं.एक चांगला प्रकाशक शोधावा लागायचं.मग त्याचं मार्केटिंग करून जास्तीत जास्त लोकांचा प्रतिसाद मिळवायचा.या सर्व गोष्टी एक लेखकाला, कवीला कराव्या लागायच्या.
आता मात्र हे सर्वच खूप सोपं झालं आहे.आपण आपलं लिखाण , आपल्या कविता, आपल्या कथा, प्रेरणादायी लेख, प्रेरणादायी विचार, आपल्या रेसिपीज, आपले सण उत्सव यांची माहिती, शैक्षणिक माहिती, करियर मार्गदर्शन करणारे लेख अशा बऱ्याच प्रकारची माहिती आपण स्वतः आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करू शकतो.एकाच वेळी संपूर्ण जगभरातून आपल्या लिखाणाला इंटरनेट वर आपल्या ब्लॉग च्या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद मिळवू शकतो.एकदा प्रकाशित केलेलं आपलं लिखाण इंटरनेट वरून कधीही वाचू शकतो. संपूर्ण जगभरातील वाचकांचा प्रतिसाद मिळवू शकतो.आपल्या लेखनाची, कामाची वाहवाह मिळवू शकतो.
ब्लॉग म्हणजे काय ? What is blog ?
ब्लॉग म्हणजे आपलं स्वतःचं इंटरनेट वरचं असं ठिकाण जिथं आपण काही माहिती, लेख, कथा , कविता, शैक्षणिक माहिती, करियर मार्गदर्शन करणारी माहिती, रेसिपीज, आपल्या कला आणि आपली आवड ,आपले छंद माहितीच्या स्वरूपात कोणतंही शुल्क न भरता संपूर्ण पणे विनाशुल्क संपूर्ण जगभरातील लोकांच्या पर्यंत घेऊन जाण्याचं मध्यम आहे .
What is blogger ? ब्लॉगर म्हणजे काय ?
इंटरनेट वर आपला स्वतःचा ब्लॉग म्हणजेच वेबसाईट तयार करून त्याच्या माध्यमातून नियमितपणे आपल्याकडील इन्फॉर्मेशन शेअर करणं याला ब्लॉगिंग blogging असं म्हंटलं जातं. जो व्यक्ती हे ब्लॉगिंग करतो त्याला ब्लॉगर blogger असं म्हंटलं जातं.
ब्लॉग हा जगातील वेगवेगळ्या भाषेमध्ये लिहिला जातो.मी तुम्हाला ही माहिती पुरवते आहे.ही भाषा मराठी आहे.मराठी भाषेमधून लिहिलेला ब्लॉग मी तुमच्यापर्यंत घेऊन येते.नियमितपणे वेगवेगळ्या विषयांवर मी लिखाण करते आणि ते माझ्या HTTPS://motivationstoyou.blogspot.com या वेबसाईटवरून म्हणजेच ब्लॉगवरून तुमच्या पर्यंत घेऊन येत असते यालाच मराठी भाषेमधील ब्लॉग असं म्हंटलं जातं.आणि मी ब्लॉगर म्हणून काम करते.
विनामूल्य टॉप ब्लॉगिंग माध्यम खालीलप्रमाणे,
Top 5 Free blogging platforms ,
1. Blogger (ब्लॉगर )
हा ब्लॉग खलील वेब ऍड्रेस वर आहे .यूजर साठी फ्री आणि वापरण्यासाठी खूप सोपा तसेच कोणत्याही कोडींग शिवाय डायरेक्ट आपण आपली वेबसाईट म्हणजेच ब्लॉग तयार करू शकतो आणि आपल्या कडील इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो.
2. WordPress ( वर्डप्रेस )
वर्डप्रेस चा वापर करून ब्लॉग बनवायचा असेल तर तुम्हाला खलील वेब अड्रेस वर जावं लागेल.
3. Joomla ( जुमला )
HTTPS://www.joomla.org या वेब अड्रेस वरून जुमला ओपन सोअर्स सॉफ्टवेअर चा उपयोग करून आपली स्वतःची वेबसाईट तयार करू शकतो.या वेबसाईट चा वापर करून आपण आपली इन्फॉर्मेशन इंटरनेटवर शेअर करून लोकांचा प्रतिसाद मिळवू शकतो.
4. LinkedIn ( लिंकडईन )
लिंकडईन पर्सनल ब्लॉग तयार करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देते. आपले कंटेंट आपण तिथून पब्लिश करू शकतो.
5. Facebook ( फेसबुक )
फेसबुक वर आपण आपला पर्सनल ब्लॉग सुरू करू शकतो.या ब्लॉग च्या माध्यमातून आपले कन्टेन्ट लोकांच्यापर्यंत पोहचवू शकतो.
लेखन,
प्रा.डॉ. मनिषा पाटील-मोरे
वशी-कासारशीरंबे
व्हाट्सएप--9511775185
1 Comments
Great information....Mam
ReplyDeleteतुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏