विद्यार्थ्यांच्या ध्येयपूर्तीसाठी...


              विद्यार्थ्यांच्या ध्येयपूर्तीसाठी...

विद्यार्थ्यांच्या ध्येयपूर्तीसाठी...
विद्यार्थ्यांच्या ध्येयपूर्तीसाठी...


हा लेख खासकरून १० वी  आणि १२ वी च्या विद्यर्थ्यांसाठी लिहिला आहे.

यश हे सर्वस्वी तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे.तुम्ही किती खडतर परिश्रम करता,कष्ट करता,किती अविरत प्रयत्न करता यावर तुमचं यश अवलंबून आहे.यासाठी तुम्हाला तुमचं ध्येय माहित असणं खूप महत्वाचं आहे.तुम्हाला तुमचं ध्येयच माहित नसेल तर यश मिळवण्यासाठी घेतलेलं कष्ट,सारे प्रयत्न वाया जातात.

उदाहरण द्यायचं झालं तर, समजा तुम्ही खूप छान तयार होऊन घराबाहेर पडला आणि रस्त्याने चालत राहिला,खूप खूप चालताय,चालत राहताय,पण तुम्ही कुठेच पोहचत नाही.याचं कारण काय तर तुम्ही घरातून बाहेर पडताना ठरवलंच नाही की तुम्हाला कुठे जायचं आहे,कुठे पोहचायचं आहे आणि तेच तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्ही रस्त्यावर नुसतंच भटकत राहिलात.कुठे पोहचलाच नाही.

विध्यार्थ्यांनाही हीच गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे.तुम्ही नुसतंच भटकत राहण्यापेक्षा  ध्येय अगोदर ठरवा.तुमचं ध्येय ठरवलं की मग ते साध्य करण्यासाठी नियोजन बद्ध प्रयत्न सुरू करणं सोपं जातं.विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करणं आवश्यक आहे अन्यथा सर्व विषयांना समान न्याय देऊ शकणार नाही.नियोजना अभावी तुम्ही तुम्हाला जे विषय आवडतात त्याच विषयांना जास्त वेळ देता व जे विषय तुम्हाला कमी आवडतात किंवा आवडतच नाहीत अशा विषयांना कमी वेळ देता.यामुळे त्या विषयांचा तुमचा अभ्यास फारसा होणार नाही आणि  तुमचा गोंधळ उडेल व तुलनेनं तुमचा अभ्यास कमी होईल.

म्हणूनच विध्यार्थी मित्रानो,तुमचं ध्येय ठरलं की तुम्ही अभ्यासाचे नियोजन करणं आवश्यक आहे.तुम्हाला एकूण विषय किती ,त्यामधील तुम्हाला आवडणारे विषय कोणते,न आवडणारे विषय कोणते, त्यातील अवघड विषय आहेत का,रोजच्या रोज सराव करावा लागेल असे काही  विषय आहेत का.या सर्व गोष्टी लक्षात घेऊन रोजच्या रोज कसा अभ्यास करता येईल याचं नियोजन केले पाहिजे.तुमचं मुख्य ध्येय बोर्ड परिक्षेत चांगलं यश मिळवणं हे आहे.मात्र तुम्हाला याही गोष्टींचा अभ्यास करणं आवश्यक आहे की 12 वी नंतर तुम्हाला कुठे ऍडमिशन घ्यायचे आहे व त्यासाठी पात्रता काय आहे.पुढील कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला किती टक्के मार्क्स मिळवणं गरजेचं आहे.हे एकदा तुमच्या डोक्यात फिक्स झालं की मग तुम्हाला ती टक्केवारी लक्षात ठेवून त्या दृष्टीने अभ्यास करता येतो.आणि ते सोपं जातं.

तुमचा रोजचा अभ्यास सुरू असताना तुम्हीं  तुमचं आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे. आत्मपरीक्षण म्हणजे तुम्ही रोज अभ्यास करत आहात ते तुम्हाला कितपत आत्मसात झाले आहे, कितपत समजले आहे किंवा काही गोष्टी समजल्या नाहीत का या गोष्टींचं आकलन तुमचं तुम्हालाच करायचं आहे.हे करत असताना सेल्फ टेस्ट सुद्धा घेणं आवश्यक आहे.म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे कितपत लिहिता येतात हे लक्षात येईल. तसेच रोजच्या रोज अभ्यासाला बसताना मागिल किमान पाच वर्षाचे बोर्ड पेपर बरोबर घेऊन बसणं खूप महत्त्वाचं आहे.यामुळे  तुम्हाला हे समजेल की एखाद्या धड्याचा अभ्यास करताना त्यामधील बोर्ड परिक्षेत किती आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात.

तुमचं टार्गेट हे क्लास टेस्ट ते बोर्ड परीक्षा असं असलं पाहिजे.म्हणजे क्लास टेस्ट मध्ये जर कमी मार्क्स मिळाले तर त्यावर अजून जोमाने अभ्यास करून युनिट टेस्ट मध्ये त्यापेक्षा अधिक चांगले मार्क्स मिळवले पाहिजे.युनिट टेस्ट पेक्षा पहिल्या टर्म परीक्षे मध्ये अजून चांगले मार्क्स मिळवले पाहिजेत.त्यानंतर पहिली पूर्व परीक्षा.

या सर्व परीक्षांमध्ये तुम्हाला पडलेल्या मार्क्स चा ग्राफ हा चढता असला पाहिजे.म्हणजे तुम्हाला पडणारे मार्क्स हे प्रत्येक परीक्षेमध्ये मागील परीक्षेच्या तुलनेत वाढलेले असले पाहिजे.यामुळे तुमचा तुम्हाला अंदाज येईल की बोर्ड परीक्षेमध्ये तुम्ही किती टक्के पर्यंत जाऊ शकता आणि या सर्व गोष्टींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मग आपोआपच तुम्ही अजून जोमाने अभ्यास कराल.आता मात्र तुम्हाला तुमचं बोर्ड परीक्षेसाठी जे ध्येय ठेवलं होतं ते गाठण्यापासून कोणीही  थांबवू शकणार नाही.

हे करत असताना तुमची प्रबळ इच्छाशक्ती कधीही ढळू देऊ नका.प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य होतात.याचबरोबर सकारात्मक दृष्टिकोन आणि त्याला अविरत प्रयत्नांची जोड मात्र मिळाली पाहिजे.

विध्यार्थी  मित्रांनो बोर्ड परीक्षा बघता बघता येईल.आता मात्र वेळ आहे स्वतःला अभ्यासासाठी झोकून देण्याची.इथून पाठीमागच्या परीक्षांमध्ये पडलेल्या मार्क्स चा ग्राफ  जर  उल्लेखनीय नसेल तर मात्र  तुम्हाला या गोष्टीवर पुन्हा नव्याने वीचार करावा लागेल.काही प्रश्न हे स्वतःला विचारावे लागतील.

  • नेमकं काय चुकतंय?
  • अभ्यास चुकीच्या पद्धतीने करतोय का?. 
  • आपल्याला नेमकं काय करायचं आहे तेच चुकतंय का?. 
  • तासन तास अभ्यास करून सुद्धा म्हणावं तेवढं यश का मिळत नाही?.
  • आपण चुकीच्या पद्धतीने तर अभ्यास नाही ना करत?.
  • आपण आपल्या ध्येयापासून बाजूला चाललोय का?.
  • आपण मनापासून अभ्यास करतोय का?. 
  • आपण आपल्या ध्येयाच्या वाटेवर अडथळा ठरणाऱ्या क्षणिक मोहाला तर बळी नाही ना पडलो?.

या सर्व गोष्टींचा अभ्यास करून अडथळा ठरणाऱ्या गोष्टी फेकून देऊन अभ्यासाचे पुन्हा नियोजन केलं पाहिजे आणि स्वतःला पूर्णपणे अभ्यासासाठी समर्पित केलं पाहिजे.दृढ विश्वास, प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाने या बोर्ड परीक्षेसाठी स्वतःला  झोकून द्या.

एक गोष्ट लक्षात ठेवा."अभी नहि तो कभी नहीं". 10 व 12 वी तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईन्ट आहे.तुमचं पुढचं सगळं करिअर तुमच्या बोर्ड परीक्षेच्या टक्केवारीवर अवलंबून आहे.म्हणूनच या पूर्ण वर्षात स्वतःला अभ्यासासाठी झोकून देऊन तुमच्या आयुष्याला कलाटणी देण्याचं काम करू शकतात.हे वर्ष असं जगा,असा अभ्यास करा की तुम्हाला तुमचा भविष्य काळ जर,तर चे प्रश्न जसं की, 

मी असं केलं असतं तर ,मी तसं केलं असतं तर,मी हे नाही करायला पाहिजे होतं,मी ते नाही करायला पाहिजे होतं,असे अनेक जर तर विचारायची संधीच देणार नाही.

बस जी लो अपनी जिंदगी।  मगर शान से।।


उचित ध्येय निश्चित करा
प्रबळ इच्छाशक्ती असुदे
नियोजनबद्ध प्रयत्न करा
खूप गोष्टी आत्मसात करा
आत्मविश्वास वाढवा
नेहमी सकारात्मक विचार करा
सदा आशावादी रहा
प्रगतीकडे नेणाऱ्या मित्रांची संगत करा
ध्येयाच्या वाटेत अडथळे आणणारे मोह टाळा
नेहमी आत्मपरीक्षण करा
स्वतःवर विश्वास ठेवा
आणि उंच गरुड झेप घ्या।।


लेखन,
डॉ. मनिषा मोरे
व्हाट्सएप-9511775185




Post a Comment

8 Comments

  1. लेख आवडला तर शेअर जरूर करा. तुमच्या प्रतिक्रिया पाठवा

    ReplyDelete
  2. लेख खूप छान आहे
    I agree

    ReplyDelete
  3. Excellent article which gives the proper and useful guidance the students.Tips given in the end of article are very inspirational and helps building confidence to students of 10 th and 12 th Standards.

    ReplyDelete

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏