मरता केंव्हाही येईल बस् जगता आलं पाहिजे

मरता केंव्हाही येईल बस् 

जगता आलं पाहिजे...

Motivational article, depression, life problems,

मरता केव्हाही येईल बस् जगता आलं पाहिजे


एखादं दुसरं कारण डोळ्यासमोर ठेऊन मरणाला कवटाळण्यापेक्षा हजारो कारणं शोधून रोज नव्यानं जगलं पाहिजे।।

मरता केव्हाही येईल बस् जगता आलं पाहिजे...खरंच या वाक्यामध्ये जीवन मरणाचं सार दडलं आहे.जन्माला आलेला प्रत्येक जण एक दिवस जाणार आहे.कारण मृत्यू अटळ आहे.त्यामुळे मरता केंव्हाही येईल पण जगता आलं पाहिजे.एखादं दुसरं कारण डोळ्यासमोर ठेऊन मरणाला कवटाळण्यापेक्षा हजारो कारणं शोधून रोज नव्यानं जगलं पाहिजे.खरंच जगण्यासाठी किती कारणं आहेत.

आई वडील आपल्या मुलाबाळांना मोठं करण्यासाठी,त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी,त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी जगतात.

घरातील कर्तबगार पुरुष पैसा कमावण्यासाठी ,घराला काही कमी पडू नये म्हणून जगतो.

नोकरदार आपला महिन्याचा पगार नीट पुरावा,पैशाची चणचण भासू नये म्हणून जगतो.

व्यावसायिक आपला धंदा नीट चालावा आणि चांगला फायदा व्हावा म्हणून जगतो.

एक शेतकरी शेतात खूप धान्य पिकावं व आपलं वर्ष पिकलेल्या धान्यावर नीट जावं म्हणून जगत असतो.

एक नवरा आपल्या बायकोची स्वप्न पूर्ण व्हावीत,चांगलं घर असावं म्हणून त्याच्या ईएमआय भरण्यासाठी व स्वप्न साकार करण्यासाठी धडपडतोय.

एक बायको नवऱ्याने दिलेले पैसे कमीत कमी कसे वापरता येतील आणि जास्तीत जास्त बचत कशी करता येईल आणि आपला संसार सुखाचा कसा होईल याच्यासाठी जगत असते.

म्हातारे आईवडील आपला परदेशात गेलेला मुलगा घरी परत कधी येईल ,तो ठीक असेल का,त्याची घरी परत येण्यासाठी वाट बघतायत आणी रोज काळजी करत आपलं आयुष्य घालवतायत.

आनाथाश्रमात असणारे आई वडील आपला मुलगा कधीतरी आपल्याला घरी घेऊन जाईल या आशेवर जगतायत.

अनाथ मुलं आपल्याला कुणीतरी हाथ देऊन आपल्याला साथ देतील या भावनिक आशेवर जगतायत.

मरणाचं काय ते केंव्हाही येईल पण जगण्यासाठी कारण हवंय.खायला अन्न नाही,हाताला काम नाही लॉकडाऊन मुळं कुठंच जाता येईना तरीही मुलाबाळांना घेऊन हजारो किलोमीटरचा प्रवास करणारे कामगार,मजूर पायपीट करत उन्हातान्हात आपापल्या गावी निघून गेले का तर त्यांच्याकडे मरणाला जवळ करण्यापेक्षा जगण्यासाठी अनेक कारणं होती.

रुग्णवाहिकेची सोय होत नसल्याने कित्येक गरोदर महिला त्यांच्या बाळाला जन्म देणासाठी चालत दवाखान्यात जाताना आपण बातम्यांना पाहिलं,का तर त्यांच्यासाठी जगण्याचं कारण म्हणजे त्या चिमुकल्या जीवाला या जगाचं दर्शन घडवायच होतं.

कित्येक नोकरदारांना गेल्या काही महिन्यांपासून पगार मिळाले नाहीत.कुणाचे रेंट भरणं बाकी आहे तर कुणाचे ईएमआय भरणं बाकी आहे म्हणून त्यांची जगण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची उमेद संपली नाही.

कित्येक डॉक्टर व नर्स कोरोना रुग्णांना सेवा देतायत.त्यांना नसेल का भीती संसर्गाची.तरीही अविरत त्यांचं कार्य करतायत आणि रूग्णांना बरे करतायत.

या महामारीच्या काळात आपण स्वतः ला घरात कोंडून घेतलं, मात्र सफाई कामगार परिसर स्वच्छ ठेवण्याचं आणि निर्जंतुकीकरण करण्याचं काम करतायत.खरंच काय असेल यांच्या जगण्याचं कारण.

जगणं कशाला म्हणतात हे दाखवणारं याच्याही पेक्षा विदारक चित्र म्हणजे ,आजही चप्पलचा बेल्ट तुटला तर दाबन आणि दोऱ्याने ते शिवून घालणारी लोकं आहेत.

बनियन फाटलं तर चार ठिकाणी सुई दोऱ्याने शिवून घालणारी लोकं आजही आहेत.कपड्यांना पन्नास ठिकाणी भोकं असलेले कपडे घालणारी लोकं आजही आहेत.पोराबाळांचं पोट भरावं म्हणून  उपाशी राहणारे आईवडील आजही आहेत.

ज्या शेतावर आपलं घर चालतं ,चूल पेटते ते शेत आपल्या मुलीच्या लग्नासाठी विकणारा बाप आजही आहे.त्याच्यासमोर जगण्यासाठी काय कारण असावं.

मुलाला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून उन्हातान्हात अनवाणी शेतात मोलमजुरी करून पैसे जमा करणारा बाप आजही आहे.पायाला येणारे फोड त्याच्यासाठी क्षुल्लक आहेत.पायाचे फोड तो कधीच दाखवत नाही.खरंच किती मोठं कारण आहे त्याच्याकडे जगण्यासाठी.

पूर्ण देश शांत, विना टेन्शनचा झोपलेला असतो,सण उत्सव,लग्नसमारंभ यांच्यातून आनंद  साजरा करत असतो, मात्र तिकडे देशाच्या सीमेवर अखंड पहारा देऊन ऊन,वारा,पाऊस,बर्फ,दऱ्या-खोऱ्या कशाचीही तमा न बाळगता आपलं कर्तव्य बजाविणारे,चोवीस तास स्वतः हातात बंदुक घेऊन खडा पहारा देऊन शत्रूंपासून संरक्षण करणारे आणि अखंड देशसेवेचं व्रत घेतलेले आपले सैनिक.

खरंतर त्यांच्यावर कधी आतंकवादी हल्ला होईल,कधी शत्रूची गोळी त्यांना छेदून जाईल,कधी त्यांच्यावर हिमनग कोसळेल, कुठून कधी त्यांच्यावर बॉम्बहल्ला होईल या सर्व गोष्टींची कल्पना असून देखील आपलं कर्तव्य बजावणारे आपले सैनिक यांच्यासाठी काय असतील बरं जगण्याची कारणं? कर्तव्य बजावत असताना त्यांना किती मोठ्या संकटांना सामोरं जावं लागत असेल,किती यातना सहन कराव्या लागत असतील,किती कष्ट घ्यावे लागत असतील मात्र तरीही ते जगतात मग काय असेल त्यांच्या जगण्याचं कारण? 

आयुष्यात कष्टाविना फळ नाही.पण हेही तितकंच खरं आहे की कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता बस् आपण आपलं काम करत राहणं ,त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं, आपल्यासोबत चांगली माणसं जोडणं,चांगले मित्र जोडणं, परिवारासोबत वेळ घालवणं ,तज्ञांचा सला व मार्गदर्शन घेणं ,चुकीची संगत टाळणं या गोष्टी पाळल्या तर समाजात आपला नावलौकिक ही होतो आणि आपली एक चांगली ओळखही निर्माण होते.हेच तर आहे आपण केलेल्या कष्टाचं फळ. बस् अजून काय पाहिजे हेच आहे आपल्या जगण्याचं सार आणि जगण्याचं कारण.

मरणं खूप सोपं आहे,अगदी काही सेकंदामध्ये किंवा मिनिटांमध्ये मृत्यूला आपण जवळ करू शकतो.मात्र जगणं फार अवघड आहे.याच जगण्याची कारणं मात्र प्रत्येकाची वेगवेगळी आहेत.म्हणूनच आपला शोध आपणच घेतला पाहिजे.स्वतःला कुठेही हरवून न देता ,कोणत्याही तणावाखाली न जाता ,मानसिक संतुलन न बिघडवता रोज हजारो कारणं शोधून नव्याने जगलं पाहिजे.



लेखिका,
डॉ. मनिषा पाटील-मोरे
व्हाट्सएप--9511775185


Post a Comment

14 Comments

  1. लेख कसा वाटला
    तुमच्या प्रतिक्रिया कळवा

    ReplyDelete
    Replies
    1. खुपच छान अप्रतिम

      Delete
  2. This article is very nice and gives focus on the entire life of the human being.Positive approach is required for making the life smooth and enjoyable.A will will find a way in any critical condition.Every thing is possible in life by making the proper efforts. Do the same and enjoy the every moment of life.l liked the article very much.Best wishes for "New Guj-Goshti"..


    ReplyDelete
  3. This article is very nice and such inspire us to make our life easy and how to solve problems in our life.very nice and thank you for this nice article.

    ReplyDelete
  4. आदरणीय प्रा. मनिषा मॅडम
    आज प्रत्येकजण करोनाच्या धास्तीने जगण्याचं विसरून गेला आहे. सगळे लोक हवालदिल झाले आहेत, समुद्रात भरकटलेल्या जहाजाला किनारा दिसावा तसा , तुमचा लेख आहे,
    निश्चितच भांबावलेल्या मनाला धीर देणारा लेख आहे. सकारात्मकता निर्माण करणारे अप्रतिम लेखन आहे. मॅडम आभार व्यक्त करायला शब्दच अपुरे पडतात.
    ....देवा लेखनाला बळ दे, लेखिकेला निरोगी आयुष्य दे.

    ReplyDelete
    Replies
    1. सर तुमचे खूप मनापासून आभार.लिखाणाची जी आवड आहे यातून छोटसं , थोडंस प्रोत्साहन देण्याचं काम हाती घेतलं आहे आपल्या अभिप्रायामुळे मलाही प्रोत्साहन मिळालं.

      Delete

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏