माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील करीयरच्या सुवर्णसंधी

 List of Various IT Courses After 12th 

आयटी क्षेत्रामधील जॉबच्या सुवर्णसंधी


What are various courses after 12th for most demanded Career in IT ( Information Technology ) Industry. 

12वी नंतर पुढे काय ? आयटी क्षेत्रामध्ये आपलं करियर करण्यासाठी विविध कोर्सेस कोणते आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या करियरच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत याविषयी विस्तृतपणे जाणून घ्या या लेखमधून. 

List of courses in IT, courses after 12th, courses for IT jobs
IT Courses 

माहिती आणि  तंत्रज्ञान क्षेत्रातील आमूलाग्र बदलांमुळे अलीकडच्या काळात संपूर्ण जग अगदी आपल्या जवळ आलं आहे.कॉम्प्युटर  आणि स्मार्ट फोन मधील आधुनिक तंत्रज्ञाणामुळे आपली सर्वच कामं मग ती कार्यालयीन असो, व्यवसायिक असो किंवा वैयक्तिक असो खूपच सोपी आणि फास्ट झाली आहेत.रोज नवनवीन सॉफ्टवेअर मार्केट मध्ये येत आहेत. शैक्षणिक, बँकिंग, ऑफिशियल, घरगुती उपयोगाचे असे बरेच सॉफ्टवेअर वापरून हल्ली आपली कामं पूर्ण केली जात आहेत.

गदी  आत्ताचं  उदाहरण घ्यायचं झाालं तर, मार्च 2020 पासून कोरोना म्हणजे  कोविड-19 ने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे.आपला संपूर्ण देश ह्या महाविषाणूंमुळे संकटात अडकला. हा रोग संसर्गजन्य असल्याने त्याचं संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण देश बंद करण्याचा निर्णय झाला.संपूर्ण देशभर लॉकडाऊन जाहीर झाला.शाळा, कॉलेज, खासगी,सरकारी कार्यालये सर्वच बंद करण्यात आली.एवढंच काय तर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्रालयातील कामकाज देखील बंद झालं.

सगळं बंद जरी झालं असलं तरी सर्व कामं पूर्वीप्रमाणेच सुरू होती.सरकारने सोशल डिस्टनसिंग ची घोषणा केली आणि खऱ्या अर्थाने सोशल डिस्टनसिंग सुरू झालं.देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री ,आणि सर्वच मंत्री प्रशासना सोबत आणि जनतेसोबत सोशल मीडियावरुन संपर्क साधू लागले.सर्व कामकाज घरूनच होऊ लागलं.सर्वच कंपन्या त्यांचं काम त्यांच्या एम्प्लॉई कडून घरूनच करून घेऊ लागले.यालाच वर्क फ्रॉम होम असं म्हंटलं जाऊ लागलं.यालाच रिमोट वर्किंग कल्चर असं म्हंटलं जातं.

लॉकडाऊन असून सुद्धा घरूनच कंपन्यांचं काम मात्र सुरूच होतं. कँपन्यांच्या सर्व एम्प्लॉई वर रिमोटली लक्ष ठेवलं जात आहे.ही सर्व जादुई किमया आयटी म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ची आहे.वेगवेगळ्या सॉफ्टवेअर ची आहे.झूम मिटिंग,मीट मिटिंग, फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून शासन आणि प्रशासन यांच्या मिटिंग होऊ लागल्या.जनतेशी लाईव्ह संवाद साधला जाऊ लागला.

आयटी ने अजून एक पाऊल पुढं टाकलं आहे ते म्हणजे लॉकडाऊन मुळं शाळा कॉलेज जरी बंद झाल्या असल्या तरी आता बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा शाळा कॉलेज सुरू करण्यात आल्या मात्र प्रत्यक्षात नव्हे तर ऑनलाइन च्या माध्यमातून. संपूर्ण देशभरातील शाळा कॉलेज ऑनलाइन सुरू करण्यात आली आहेत.हे सर्व शक्य झालं आहे ई -लर्निंग ची सुविधा उपलब्ध असल्या कारणाने.इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉंलॉजी च्या माध्यमातून.

आयटी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या हेतूने हा लेख लिहिला आहे.

12वी नंतर पुढे आयटी क्षेत्रात करीयर करण्यासाठी खालील प्रमाणे कोर्सेस उपलब्ध आहेत,

1.  BCA ( बिसीए ) 

बिसीए हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ असणारा कोर्स.बीसीए म्हणजे बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. 12वी आर्टस् , कॉमर्स किंवा सायन्स झालेले विद्यार्थी या कोर्स ला ऍडमिशन घेऊ शकतात.

2. BSc. Computer (बीएससी कॉम्प्युटर

तीन वर्षांचा हा कोर्स पूर्ण करून विद्यार्थी सायन्स मधून ग्रॅज्युएट होतो.सायन्स सोबत कॉम्प्युटर चे विषय देखील इथे शिकविले जातात. 12 वी सायन्स झालेले विद्यार्थी या कोर्स ला ऍडमिशन घेऊ शकतात.

3. BCS ( बिसीएस )

तीन वर्षांचा हा कोर्स पूर्ण झाला की विध्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स मधून ग्रॅज्युएट ची डिग्री मिळते.12 वी सायन्स मधून पास झालेले विद्यार्थी BCS ला ऍडमिशन घेऊ शकतात.

4. MCA ( एमसीए )

MCA म्हणजे मास्टर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. हा तीन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स.BCA, BCS आणि BSc कॉम्प्युटर झालेले सर्व विद्यार्थी या कोर्स साठी पात्र होतात.तसेच प्लेन BSc ला ज्यांचा स्पेसियलायझेशन मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटेस्टीक हे विषय आहेत  हे विद्यार्थी सुद्धा MCA ला ऍडमिशन घेऊ शकतात. MCA ऍडमिशन साठी सेन्ट्रल ऍडमिशन प्रोसेस मधून जावं लागतं. यासाठी वेगवेगळ्या कॉमन इन्ट्रान्स टेस्ट असतात त्या टेस्ट विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे.अन्यथा या कोर्स ला प्रवेश मिळत नाही.

MCA म्हणजेच कॉम्प्युटर ऍप्लिकेशन मधून पोस्ट ग्रॅज्युएट झालेले सर्वजण ज्यांना टिचिंग ची आवड आहे असे सर्वजण बीसीए, बिसीएस, बीएसी कॉम्पुटर कॉलेज वर तसेच एमसीए कॉलेज वर प्रोफेसर म्हणून काम करू शकतात.पुढे MPhil व PhD करून प्रोमोश मिळवून प्रिन्सिपॉल ही पोस्ट देखील मिळवू शकतात.

5. Diploma in IT and Computer Science ( डिप्लोमा इन आयटी अँड कॉम्प्युटर सायन्स )

तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्स मधून करता येतो.10 वी पास झालेले विद्यार्थी या कोर्स ला ऍडमिशन घेऊ शकतात. तसेच आयटीआय, व्होकेशनल किंवा 12 वी सायन्स झालेले विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा साठी पात्र होतात.हा कोर्स MSBTE च्या अखत्यारीत येतो.

6. BE / BTech ( बीई / बिटेक )

बॅचलर इन  इंजिनिअरिंग / बॅचलर इन टेक्नॉलॉजी. चार वर्षाचा हा कोर्स पूर्ण करून इंजिनिअरिंग मधून ग्रॅज्युएट होता येतं.12 वी सायन्स चे विद्यार्थी ज्यांचा  'ए' ( फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स ) ग्रुप होता हे सर्व विद्यार्थी या कोर्स ला ऍडमिशन घेण्यासाठी पात्र होतात.

BE व BTech ला ऍडमिशन घेण्यासाठी सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस मधून सर्व विद्यार्थ्यांना जावं लागतं.त्यासाठी जेईई,सीईटी अशा बऱ्याच प्रकारच्या कॉमन एन्टरन्स टेस्ट आहेत, विद्यार्थ्यांनी यापैकी एखादी टेस्ट देणं गरजेचं आहे.अन्यथा ऍडमिशन मिळू शकत नाही.तसेच 12 वी चे मेन विषय म्हणजे पीसीएम याना ओपन कॅटेगरी साठी 150 मार्क्स व रिझर्व्हेशन  कॅटेगरी साठी 145 मार्क्स असतील तरच पुढे इंजिनिअरिंग ला ऍडमिशन मिळू शकतं.

डिप्लोमा झालेले विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर यइंजिनियरिंग ला ऍडमिशन घेऊ शकतात.

7. ME / MTech ( एमई / एमटेक )

दोन वर्षांचा मास्टर इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हा कोर्स. इंजिनिअरिंग ची ही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री.बीई व बिटेक केलेले विद्यार्थी एमई व एमटेक ला प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी 'गेट' ही परीक्षा द्यावी लागते किंवा त्या त्या युनिव्हर्सिटी ची कॉमन एन्टरन्स द्यावी लागते.

ME व MTech झालेले  ज्यांना टिचिंग ची आवड आहे असे सर्व विद्यार्थी  BE, BTech तसेच ME , MTech कॉलेज वर प्रोफेसर म्हणून काम करू शकतात.पुढे MPhil व PhD करून प्रोमोश मिळवून प्रिन्सिपॉल पोस्ट मिळवू शकतात.

डिप्लोमा सोडून वरील सर्व कोर्सेस प्राप्त करणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पात्र होतात.एमपीएससी, यूपीएससी ,बँकिंग, पोस्ट, एलआयसी सारख्या आणि अशा बऱ्याच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा हे विद्यार्थी देऊ शकतात आणि क्लासवन ऑफीसर बनू शकतात.


वरील सर्व कोर्सेस च्या विद्यार्थ्यांना शिकविले जाणारे विविध विषय,

वरील कोर्स करणारे सर्व विद्यार्थी त्याच्या पूर्ण अकॅडमीक मध्ये वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लेंग्वेज जसं की,  C, C++, Java, dot Net , HTML, Java Scripts, VB Script, Python, R इत्यादी प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकतात.

डेटाबेस मध्ये Oracle, SQL, My SQL, PostGre SQL इत्यादी डेटाबेस चे विषय शिकविले जातात.

कॉम्प्युटर नेटवर्किंग तसेच सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग चे विषय शिकवून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट च्या सर्व पद्धती शिकविल्या जातत.तसेच सॉफ्टवेअर मॅनेजमेंट आणि टेस्टिंग चे विषय शिकवून विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर चांगल्या क्वालिटीचं कसं बनवायचं हेही शिकविलं जातं.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे तसेच बिग डेटा आणि डेटा सायन्स सारखे विषय शिकवून विद्यार्थ्यांना आधुनिक माहिती तंत्रज्ञान देखील शिकविलं जातं आणि सर्व लेटेस्ट गोष्टींचं ज्ञान दिलं जातं.

क्लाउड कॉम्पुटिंग सारखे विषय शिकवून खूप मोठया प्रमाणात असणारा डेटा कसा स्टोअर करायचा आणि त्याला सिक्युरिटी कशी द्यायची या गोष्टींचं ज्ञान देखील दिलं जातं.

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ,मोबाईल ऍप डेव्हलपमेंट या सर्व गोष्टींचा सराव करून घेतला जातो.विध्यार्थी इथे सॉफ्टवेअर तयार करायला शिकतात.तसेच वेबसाईट देखील डिझाईन करायला शिकतात.गेम डेव्हलपमेंट , ऍनिमेशन , कार्टुन मुव्ही तयार करायला ही शिकविलं जातं.

वेगवेगळ्या फील्ड मध्ये वापरले जाणारे सॉफ्टवेअर जसं की शैक्षणिक, बँकिंग, सायंटिफिक, मेडिकल, रिसर्च ,गव्हर्नमेंट , मिलिटरी, ऐरफोर्स, नेव्ही, पोलीस, सायबर क्राइम आणि सिक्युरिटी अशा बऱ्याच प्रकारचे सॉफ्टवेअर विद्यार्थी तयार करायला शिकतात.

आयटी क्षेत्रात असणाऱ्या जॉबच्या सुवर्ण संधी Career Opportunities In IT,

  1. कॉम्प्युटर सिस्टीम अनालिस्ट
  2. सिस्टिम डिझायनर
  3. सॉफ्टवेअर इंजिनिअर ,कॉम्प्युटर प्रोग्रॅमर
  4. सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन डेव्हलपर
  5. गेम डेव्हलपर
  6. वेब डेव्हलपर
  7. सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनिअर
  8. डेटाबेस अडमिनिस्ट्रेटर
  9. कॉम्प्युटर नेटवर्क अँड सिस्टीम अडमिनिस्ट्रेटर
  10. कॉम्प्युटर नेटवर्क अँड सिक्युरिटी इंजिनिअर
  11. कॉम्प्युटर नेटवर्क आर्किटेक्ट
  12. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अनालिस्ट
  13. डेटा अनालिस्ट
  14. डेटा सायंटिस्ट









लेखन,
प्रा.डॉ. मनिषा पाटील-मोरे
वशी-कासारशीरंबे
व्हाट्सएप--9511775185
डॉ. मनिषा मोरे



Post a Comment

0 Comments