तुम्हाला ब्लॉगर बनायचंय?

 तुम्हाला ब्लॉगर बनायचंय? 

तुम्हाला तुमचा ब्लॉग सुरू करायचा आहे ? 

ब्लॉगर, blogger,blogging , want to your own blog
तुम्हाला ब्लॉगर बनायचंय?

ब्लॉग  म्हणजे काय हे मागील पोस्ट मध्ये सांगितलं होतं. 


इंटरनेट च्या  माध्यमातून आपल्या जवळील माहिती नियमितपणे एका विशिष्ट ठिकाणाहून प्रकाशित करणं आणि संपूर्ण जगभरातील वाचकांचा प्रतिसाद मिळविणे बहुदा यासाठीच बरेचजण ब्लॉग लिहितात.

ब्लॉग च्या माध्यमातून आपलं लिखाण, कथा, कविता, लेख, प्रेरणादायी विचार,बातम्या, राजकिय घडामोडी, शैक्षणिक माहिती, करियर मार्गदर्शन करणारे लेख, पाककलेच्या रेसिपीज इत्यादी आणि असं बरीच माहिती ब्लॉगर लिहू शकतो आणि आपल्या स्वतःच्या संकेतस्थळा (वेबसाईट) वरून संपूर्ण जगभर प्रकाशित करू शकतो.

ब्लॉग लिहिण्यासाठी तुम्ही तुम्हाला हवी ती भाषा निवडू शकता.जगात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.त्यापैकी एक भाषा निवडून आपण ब्लॉग ची सुरुवात करू शकतो.

तसेच ब्लॉग च्या माध्यमातून आपण गुगल कडून पैसे ही कमावू शकतो.आपल्या ब्लॉग वरती गुगलच्या जाहिराती सुरू करून आपण पैसे कमावू शकतो.गुगल कंपनी ब्लॉगर ला ब्लॉग च्या माध्यमातून पैसे कामावण्याची संधी देतं.

ब्लॉग च्या माध्यमातून टॉप चे ब्लॉगर दरमहा  वीस ते पंचवीस लाख दरमहा कमावतात. जाहिराती सुरू झाल्या की सुरुवातीला आपण पंधरा ते वीस हजार आरामात कमावू शकतो.

लेखकाची लिखाणाची आवड ही जोपासली जाते आणि त्या माध्यमातून तुम्हाला अर्निग ही करता येतं.

इंटरनेट वर तुमचं स्वतःचं संकेतस्थळ तयार करा आणि स्वतःच प्रकाशक बना आणि संपूर्ण जगभरातील वाचकांच्या प्रतिक्रिया मिळवा.

ब्लॉगर कसं बनता येईल आणि स्वतःची वेबसाईट, स्वतःचा ब्लॉग कसा तयार करता येईल याची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी एकदा संपर्क जरूर साधा.






लेखन,
प्रा.डॉ. मनिषा पाटील-मोरे
वशी-कासारशीरंबे
व्हाट्सएप--9511775185
डॉ. मनिषा मोरे





Post a Comment

3 Comments

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏