खरंच गरज आहे शिवराज्याची


खरंच गरज आहे शिवराज्याची ....

Ch.Shivaji Maharaj

Shivjayanti

  

Cha.Shivaji Maharaj

प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज महाराज

श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय।।


अशी  घोषणा जेंव्हा कानावर पडते तेंव्हा अक्षरशः अंगावर् शहारे येतात.एक वेगळं स्फुरण चढतं, एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि आपली मान अभिमानाने ताठ होते.आपल्याला गर्व वाटतो की आपण अशा महाराष्ट्रात जन्म घेतलाय जी भूमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली आहे.

ज्या राजाने आपल्या बुद्धी चातुर्याने शत्रूला सळो की पळो करून सोडलं,औरंगजेब सारख्या बलाढय शत्रूला देखील आपल्या गनिमी काव्यापुढे झुकावं लागलं, शत्रूंच्या बलाढ्य सैन्यापुढे आपलं तुटपुंज सैन्य घेऊन शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ मानून शत्रूंना पळवून लावून आपल्या स्वराज्याची स्थापना केली. आणि रयतेचं राज्य आणलं.आपल्या राष्ट्राला मुघलांच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं व रयतेचं राज्य आणलं.

हे स्वराज्य लोकांचं  होतं, इथं लोकांच्या वर अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा होती,इथं परस्त्रीला आईचा दर्जा दिला जात होता.परस्त्रीकडं कुणी वाईट नजरेनं पाहण्याचा प्रयत्न जरी केला तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा केली जायची.

शत्रूच्या ही सुनेला, लेकीला खणा नाराळाने ओटी भरून तिची शत्रूच्या राज्यात मोठ्या मानाने पाठवणी केली जायची. तिलाही आईचं स्थान दिलं जायचं. असा आपला राजा होता. अशी आपल्या राजाची शिकवण होती. अशा राजाकडे आणि या राजाच्या स्वराज्याकडे वाईट नजरेनं बघताना शत्रू दहा वेळा विचार करायचा. एवढ्या मोठ्या राजाच्या राज्यात आपण जन्म घेतला ही मोठी अभिमानाची आणि गर्व करावी अशी गोष्ट आहे.

आपल्या या राजाचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की कर्तृत्वाच्या गोष्टी मला सांगायला आणि तुम्हाला ऐकायला खूप दिवस लागतील.

आपल्या राजाची आपण शिवजयंती साजरी करतो. आपल्या राजावर आपलं किती प्रेम आहे हे दाखवतो. आपल्याला आपल्या राजाचा किती अभिमान आहे हे दाखवतो.पण मला असं वाटतं की हे फक्त दाखवण्यासाठी आहे. कारण आपल्या राजानं जी विचारधारा स्वराज्यात अंगिकारली आणि रयतेलाही अंगिकारण्यास भाग पाडले, ती विचारधारा आज लोप पावली आहे. तो विचार, तो आचार आज आपल्या मध्ये आहे का हाच मुळी मोठा प्रश्न आहे.

परस्त्रीला मान द्यायचं सोडा,इथं तर आपल्याच लेकी सुनांना भरदिवसा पेटवून दिलं जातंय.भरदिवसा त्यांच्यावर अत्याचार होतायत.त्यांच्यावर बलात्कार होतायत. आपल्या लेकी-सुना घरातून बाहेर पडल्या रे पडल्या की हे डोंब कावळे,हे लांडगे त्यांच्यावर झडप घालतायत.त्यांच्यावर टोच्या मारून त्यांना रक्तबंबाळ करून त्यांचा जीव तरी घेतायत नाहीतर स्वतःचा जीव द्यायला  भाग तरी पाडतायत.

इथं किती तरी निर्भया अत्याचाराच्या बळी पडल्यात.आपल्याच राज्यात आपल्याच लोकांच्या वाईट नजरांनी घायाळ होतायत.हैवानांच्या विकृतीनं दररोज एखादी तरी निर्भया अत्याचाराला बळी पडतेय.या हैवानांना कडक असं शासन होत नाही.त्यामुळेच हे हैवान मोकाट सुटलेत.

हे सगळं पाहत असताना मला आज खरंच असं वाटतंय की आज माझा राजा हवा होता.माझ्या राजाचा आचार, विचार, बुद्धीचातुर्य, आणि राजानं केली जाणारी शिक्षेची दहशत यामुळे आजच्या हैवानांना आणि त्यांच्या विकृतींना आळा बसला असता.आयाबहिणींची स्वतःच्या अब्रूची लक्तरे काढण्यापासून प्रबंध बसला असता.एक स्त्री म्हणून मला आज खरच असं वाटतंय की शिवराज्य असायला पाहिजे ,शिवराज्य पुन्हा यायला पाहिजे.जिथं आपल्या आया-बहिणींना नव्हे तर परस्त्रीलाही आईचं स्थान मिळेल.

म्हणूनच मला आज खरंच असं वाटत आहे की,   शिवराज्य पुन्हा यायला हवं.

मग माझ्यासारख्या अनेक स्त्रिया ज्यांना घरातून बाहेर पडताना मनाच्या कोपऱ्यात कुठंतरी या हैवानांची भीती वाटते ती भीती नाहीशी होईल. मनावरचं दडपण कमी होईल. आणि वाईट विकृतींना आळा बसेल. 

खरंच गरज आहे शिवराज्याची, खरंच आज गरज आहे शिवराज्याची.

जय भवानी जय शिवाजी.

छत्रपती शिवाजी महाराज की जय.



लेखन,
डॉ. मनिषा मोरे
व्हाट्सएप 9511775185



Post a Comment

9 Comments

  1. प्लिज लेख कसा वाटला कमेंट करून कळवा
    अजून काय चेंजेस असतील तर कृपया कमेंट करा

    ReplyDelete
  2. खूप सुंदर लिखाण. 👌

    ReplyDelete
  3. Khrch khupch chan🚩.......jay shivray ....jay jijamata..... jay shmbhuraje🚩

    ReplyDelete
  4. Khrch khupch chan🚩.......jay shivray ....jay jijamata..... jay shmbhuraje🚩

    ReplyDelete
  5. Khup Chan lihal aahes dide tu.kharch jar aaj shivrajy ast tar khup Kahi ghadl ast........
    Jay shivray ll jay jijau ll jay shamburaje ll
    Keep it up 😉☺️

    ReplyDelete
  6. खूप छान ....
    अगदी कमी शब्दात खूप काही सांगून गेलात आपण.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच आचरण सर्व लोकांनी करावं... तरच खऱ्या अर्थाने महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याच अस्तित्व टिकून राहील.......
    जय जिजाऊ जय शिवराय.....

    ReplyDelete

तुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏