अनिल म्हणजे ..
बहुजन समाजापर्यंत ज्ञानाची गंगा घेऊन जाणारे थोर समाजसुधारक, शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील ( आण्णा ) यांच्या महान कार्याने प्रेरित होऊन तसेच छ. शाहू महाराज, म.ज्योतीबा फुले ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा गाढा पगडा असणारे प्रा.अनिल पाटील सर यांनी कर्मवीर शिक्षण संस्थेची स्थापना करून कन्या शाळा कामेरी व आदर्श विद्यालय कामेरी या दोन शाळा सुरू केल्या.
समाजातील सर्वच स्तरांमध्ये ज्ञानाची गंगा पोहचविण्याचं महान कार्य करणारे दादा, आज 5 सप्टेंबर, शिक्षक दिनानिमित्ताने तुमच्या विचारधारेला आणि अविरत शिक्षणप्रसाराच्या कार्याला सलाम.
कर्मवीर शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा प्रा. अनिल पाटील सर ( दादा ) यांच्या विचारधारेची आणि त्यांच्या शिक्षण सेवेची ओळख सांगणारी खालील रचना,
अनिल म्हणजे ..
अनिल म्हणजे वारा ..
अनिल म्हणजे धडपड ..
सतत पळणारा ..
कशाच्या तरी शोधात राहणारा ..
नव्याचा ध्यास घेणारा ..
परंपरेला छेद देणारा ..
विज्ञान सन्मुख असणारा ..
जातीपातीची बंधने तोडणारा ..
झोपडपट्टीत जाऊन दीनदलितांचे अश्रू पुसणारा..
बायकोला सावित्रीबाईच्या मार्गावरून चालवीत नेणारा ..
शिक्षणाची गंगा गावात वाहती ठेवणारा ..
शिक्षण महर्षींची वाट चोखाळणारा ..
राजकारणाची ,काळाची पाऊले ओळखणारा ..
ग्रंथ (पुस्तके )घरोघरी पोहचवीणारा ..
अनिल म्हणजे शाहू , फुले व आंबेडकरांचा
वारसदार शोभणारा एक अभ्यासू प्राध्यापक .
1 Comments
Khup chan likhan
ReplyDeleteतुमचा अभिप्राय जरूर नोंदवा.लेख तुमच्या प्रियजनांना शेअर करा.🙏🙏